अहमदनगर बातम्या

राज्यपालांच्या दौऱ्यातून शिर्डीतील साई दर्शन सोहळा वगळला.. तर्क वितर्कास उधाण

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑक्टोबर 2021 :-महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोशारी हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. यामध्ये आज दि.27 रोजी ते शिर्डी येथील साईबाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे असा पूर्वनियोजित दौरा आखण्यात आला होता.

मात्र आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांचा आजचा आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या मंदीरातील राखीव ठेवलेला दर्शनपुजेचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे.

रद्द करण्यामागील नेमके कारण साईसंस्थान प्रशासनाला समजू शकले नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. राज्यपाल मुंबई येथील राजभवनातून सकाळी 8 वाजता हेलिकॉप्टरने शिर्डीकडे रवाना होऊन शिर्डी हेलीपॅडवर आगमन करणार आहे.

त्यानंतर तेथून साईमंदीरात सकाळी सव्वानऊ ते दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या हस्ते साईंची पाद्यपूजा दर्शन कार्यक्रम राखीव ठेवला होता. याच पार्शवभूमीवर शिर्डीत ठिकठिकाणी नाकाबंदी करून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

परंतु मंगळवारी दुपारी अचानक जिल्हाधिकारी यांच्याकडून साईबाबा संस्थानला प्राप्त झालेल्या नियोजित दौर्‍यात साईमंदीर वगळण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत संस्थान प्रशासनाशी संपर्क साधून विचारले असता त्यांना देखील कारण कळवले नसल्याचे सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office