शिवीगाळ करून वाळूचा डंपर पळवून नेला ! पाच जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कोपरगाव येथील तहसीलदारांच्या वालु कोरी विरोधी पथकाने कारवाईसाठी ताब्यात घेतलेला डंपर कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याला दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करून पळवून नेल्याची घटना काल गुरूवारी (दि.९) पहाटे पावणेसहा वाजता कुंभारी पेट्रोल पंपाजवळ घडली.

याप्रकरणी पाच जणाविरोधात कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख उर्फ राजामहंमद शेख, विना नंबर ढंपरवरील अनोळखी चालक स्विफ्ट कार मधून आलेले तीन अनोळखी इसम, अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदावरी नदीपात्रातून बेसुमार वाळुचा उपसा वाढण्याचे प्रमाण वाढल्यानंतर व वाळु तस्करांनी तालुक्यात पुन्हा थैमान घातल्यानंतर तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी त्याची दखल घेतली व

गुरुवारी संदिपकुमार भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली देर्डे फाटा येथे गोदावरी नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा होवून वाळूची चोरटी वहातूक होत असल्याची खबर मिळाल्यानंतर काल गुरुवारी पहाटे ४ वाजता महसूल पथक घटनास्थळी जावून धडकले व वाळू असलेल्या विनानंबरच्या डंपर आढळून आला.

त्यावरील चालकाला परवान्याची विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर सदर वाहन तलाठी प्रविण डहाके व इंगळे यांना जप्त करण्यास सांगितले. सदर वाहन तहसील कार्यालयाकडे नेत असता जेऊरकुंभारी येथे एचपी पेट्रोल पंपानजिक सकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास

राजु शेख व त्याचे अन्य ३ साथीदार यांनी संगनमत करुन डंपर जप्त करण्यास अडथळा केला. तसेच आरोपी राजु शेख याने कामगार तलाठी प्रविण डहाके यांना डंपरमधून हात धरुन ओढले व डंपरखाली उतरवले त्यांना धक्काबुक्की केली.

यावेळी आरोपी राजु शेख याने धमकी देवून त्याचेसोबत असलेले अनोळखी आरोपींनी प्रविण डहाके यांचे हातातील मोबाईल हिसकावून घेत असतांना डहाके यांनी विरोध केला. त्यावेळी आरोपी शेख याने हातातील काठीने त्यांच्या उजव्या हातावर व उजव्या पायावर मारुन दुखापत केली व धाकदपटशा दाखवून डहाके यांच्या ताब्यात असलेला डंपर बळजबरीने पळवून नेला आहे.

याप्रकरणी डहाके यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपी राजु शेख अनोळखी चालक व अन्य इसमांवर सरकारी कामात अडथळा आणला, पर्यावरण संरक्षण कायदा व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरिक्षक प्रदिप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक भरत दाते हे पुढील तपास करीत आहेत.

सध्या गोदापात्रातून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असून त्यासाठी आम्ही महसूल यंत्रणा सतर्क केली आहे. महसूल कर्मचाऱ्यांवर होणारे असे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाही. या पेक्षा आणखी कठोर कारवाई करु अशा पद्धतीने कुठे घटना घडत असतील, तर नागरीकांनी पुढे येवून त्या महसूल खात्यास कळवण्याचे आवाहन तहसीलदार संदिपकुमार भोसले यांनी केले आहे.