प्रवरेतील शोध मोहीम थांबली ! सर्व मृतदेह सापडले, दोघांना शोधताना चौघे बुडाले, प्रशासनासह लोकप्रतिनिधीही जबाबदार, पहा इतिवृत्तांत

Ahmednagarlive24 office
Published:
pravara

दोन दिवसांपासून अकोले तालुक्यातील सुगाव हाद्दीत प्रवरा नदीक्षेत्रात सुरु असणारे मृत्यूतांडव व मृतदेहांचा शोध घेण्याचे काम अखेर आज (दि. 24 मे) थांबले. नदीपात्रात पोहोताना दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेले तीन जवान व एक स्थानिक असे चौघे बुडून मृत्युमुखी पडले. असे सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत.

चौघांचे मृतदेह यापुर्वीच सापडले होते. काल प्रवरेचे रोटेशन बंद केले म्हणून पाणी आटले आणि बेपत्ता असणारे दोन्ही मृतदेह वर तरंगत असल्याचे दिसले. पहिल्या दिवसापासून हरवलेला जेडगुले व काल बुडालेले वाकचौरे या दोघांचा शोध घेण्यात पथकाला यश आले. यातील एक मृतदेह अगदी काही अंतरावर आढळून आला तर जेडगुले हा थेट कळस हाद्दीत सापडला आहे.

हे सर्व घडले याचे कारण म्हणजे प्रवरेचे रोटेशन बंद केले म्हणून. अर्थात पहिल्याच दिवशी प्रवरेचे पाणी बंद केले असते. तर, आज ही वेळ आली नसती असे लोक आता म्हणतायेत. पाणी नेणाऱ्यांना अकोल्याच्या लोकांचे काही घेणेदेणे आहे की नाही? असाही संतप्त सवाल नागरिक करत आहेत.

दर्दैवाने आज ही वेळ आली उद्या पुन्हा येऊ नये यासाठी उपोयोजना आता लोकप्रतिनिधींनी करायला हव्यात, आपत्तीच्या काळात तरी पाणी बंद करण्याचा निर्णय घ्यायला हवा असे लोक म्हणत आहेत. दि. 22 मे 2024 रोजी सागर पोपट जेडगुले (वय 25) व अर्जुन रामदास जेडगुले (वय 18) ही दोघे केटी वेअर मध्ये पोहण्यासाठी गेले होते.

तेव्हा ही दोघे पाण्यात बुडाले. त्यानंतर त्यांना काढण्याचे शर्तीचे प्रयत्न झाले. मात्र, यश आले नाही. सायंकाळी या दोघांमधील सागर जेडगुले याचा शोध लावण्यात स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र, अर्जुन जेडगुलेचा मृतदेह सापडत नव्हता.

म्हणून दुसऱ्या दिवशीच SDRF चे जवान आले व 23 मे रोजी सकाळी शोधमोहिम सुरु झाली. यावेळी गणेश देशमुख हे स्थानिक नागरिक त्यांच्यासोबत होते. हे पथक काही काळ अर्जुनचा मृतदेह शोधत फिरले. परंतु मृतदेह मिळाला नाही. केटी वेअरच्या भिंतीहून पाणी पडत होते तेथे गणेश वाकचौरे यांची बोट गेली परंतु तेथे भोवरा निर्माण झाल्याने ही बोट बुडाली.

यातील तिघांचा मृत्यू झाला व मृतदेह सापडला. दोघे बचावले. परंतु गणेश व जोडगुले यांचा मृतदेह मात्र सापडत नव्हता. आज अखेर हे दोन्ही मृतदेह सापडले.  यात पोलीस उपनिक्षक प्रकाश नाना शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा व पोलीस वाहन चालक वैभव सुनील वाघ यांचाही मृतांत समावेश आहे.

22 तारखेला दुपारी दोन तरुण पाण्यात बुडाले होते. तेव्हाच प्रशासनाने पाणी बंद करावे अशी विनंती करण्यात आली होती असे काही ग्रामस्थ सांगत आहेत. परंतु ते तसे न झाल्याने मृतदेह सापडला नाहीच तर शिवाय आणखी चौघे त्यात बुडाले. पाणी बंद करण्यासाठी व मृतदेह मिळविण्यासाठी तालुक्यातील नेत्यांना आंदोलन करावे लागते ही फार दुर्दैवी बाब असल्याचे बोलले जात आहे.

घटनास्थळ दाखविणे, स्थळाची माहिती देणे, नदिच्या पात्राची माहिती देणे हे स्थानिक प्रशासनाचे काम होते. तर, पथक यायच्या आत वस्तुनिष्ठ माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करणे हे स्थानिक प्रशासनाचे काम होते. त्यांनी त्यांचे काम पार पाडले नाही म्हणून गणेश वाकचौरे आणि अन्य चार जणांचा जीव गेला असे आता लोक म्हणत आहेत.