गार्ड अभावी शहरातील ‘एटीएम’ची सुरक्षा आली धोक्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-अ‍ॅटोमॅटिक टेलर मशीन अर्थात एटीएम अन् सोप्या मराठीत सांगायचे, तर हवे तेव्हा पैसे काढण्याची सुविधा. आता हीच एटीएम केंद्रे असुरक्षित बनली आहेत.

शहरातील एटीएमच्या सुरक्षेकडे बँकांनीच पाठ फिरवली आहे. शहरात सुमारे १५० एटीएम असून त्यापैकी केवळ २० टक्के एटीएमवरच सुरक्षा रक्षक आहेत.

आठ दिवसांपूर्वी पाइपलाइन रस्त्यावरील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. पोलिसांनी वेळोवेळी सांगूनही सुरक्षा रक्षक, अलार्म व सीसीटीव्ही यासारख्या सुरक्षेकडे बँका दुर्लक्ष करत असल्याने एटीएम मशीनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील २० ते २५ एटीएमवरच सुरक्षा रक्षक आहेत.

अन्य एटीएम मात्र असुरक्षित आहेत. उघडे दरवाजे, बंद पडलेले सीसीटीव्ही अशीच या एटीएमची अवस्था आहे. सुरक्षारक्षकाचा खर्च परवडत नसल्याने अनेक बँकांनी सुरक्षारक्षक काढून टाकले आहेत. त्यामुळे एटीएम केंद्राची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एटीएमधून पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. एटीएम रुममध्येच ग्राहकांची लूट करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.

त्यामुळे बँकांनी एटीएमच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे. एटीएममध्ये जाऊन पैसे काढून फसवण्याचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. सुरक्षा रक्षक असतील तर या प्रकारांना आळा बसेल, असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24