अहमदनगर जिल्हा परिषदेमधील ‘ती’ प्रणाली राज्यात सर्वत्र राबविणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्हा परिषदेने तत्कालीन अध्यक्षा शालिनी विखे यांच्या कार्यकाळात 26 जानेवारी 2019 ला अर्थ विभागात जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम या प्रणालीचा वापर केला होता.

त्याच धर्तीवर राज्य पातळीवरून ग्रामविकास विभागाने ही प्रणाली राज्यातील सर्व जिल्हा परिषदेत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार जिल्हा परिषद स्तरावरील निधीचे वितरण व संनियंत्रण करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये एकसूत्रता रहावी यासाठी या प्रणालीचा वापर करण्यास शासन मान्यता दिली आहे.

जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम या प्रणालीच्या माध्यमातून शासनास अभिप्रेत असलेले एकात्मिक वित्तीय व्यवस्था, योजनेचे व्यवस्थापन आणि देयक प्रणाली सर्व जिल्हा परिषदांमध्ये राबविण्यात येऊन त्यामध्ये एकसूत्रता राहणार आहे. ही प्रणाली विकसीत करणे,

त्याची वार्षिक देखभाल, इत्यादी बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँकेकडून मोफत पुरविण्यात येईल. या प्रणालीद्वारे जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व योजनांची अर्थसंकल्पिय तरतूद, लेखे आणि प्रदाने यांचे पूर्णत:एकात्मिककरण, बँकेच्या पास बुकातील नोंदींचा ताळमेळ हा या प्रणालीद्वारे घेतला जाणार आहे.

त्यामुळे व्यक्तिसापेक्ष चुका आणि विलंब टळणार आहे. शासनाला आवश्यक असलेले विविध अहवाल या प्रणालीमार्फत आपोआप तयार होणार असल्याने त्यामध्ये होणार्‍या व्यक्तीसापेक्ष चुका आणि विलंब टळणार आहे.

 या आधीही मिळाला होता बहुमान :- यापूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील 2007 ते 2012 या काळात पहिल्या जिल्हा परिषद पातळीवर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पध्दतीने समुपदेशनाने करण्यात आल्या. यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता आली होती.

पुढे राज्य सरकारने शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्हा परिषदेला हा पहिला राज्य पातळीवर पोहचला होता. आता जिल्हा परिषद फंड मॉनिटरींग सिस्टीम या प्रणालीचा दुसरा निर्णय राज्य पातळीवर पोहचला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24