अहमदनगर बातम्या

संगमनेरातील बेकायदेशीर कत्तलखान्याचे शटर आंदोलनामुळे झाले डाऊन

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- संगमनेर शहरात मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल केली जात आहे. शहरातील जमजम कॉलनी व परिसरात खुलेआम बेकायदेशीर कत्तलखाने चालवली जातात.

हे कत्तलखाने बंद करावे व सराईत गुन्हेगारांना तडीपार करावे या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते.

दरम्यान या आंदोलनाला यश आले असून नुकतेच संगमनेर शहरातील चार कत्तलखाने त्वरित सील करण्यात आले आहेत. दरम्यान संगमनेर शहरात सुमारे दहा कत्तलखाने सुरू आहे.

यातील अवघे चार कत्तलखाने सिल करण्यात आल्याने उर्वरित कत्तलखान्यावर कारवाई कधी करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या दुर्लक्षामुळेच शहरात बेकायदेशीर कत्तलखाने सुरू असल्याचे हिंदूत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी म्हटले आहे.

शहरातील कत्तलखाने उद्ध्वस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दरम्यान येत्या दोन दिवसात सर्व कत्तलखाने उद्ध्वस्त करण्याची लेखी हमी अधिकार्‍यांनी दिली आहे.

पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचीही लेखी हमी दिल्याने या कारवाई कडेही अनेकांचे लक्ष लागून आहे. तसेच या प्रकारावर वरिष्ठ अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख त्यांच्याबाबत काय निर्णय घेतात याकडेही अनेकांचे लक्ष लागून आहे.

Ahmednagarlive24 Office