अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तहसील कार्यालयात आज “जनता दरबारा’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांची बाजू घेत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
स्वस्त धान्याचा काळा बाजार करून गरिबांच्या तोंडातील घास हिसकावणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ज्या शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यांचे वाद आहेत,
अशा शेतकऱ्यांच्या उताऱ्यांवर पोटहिश्श्याची नोंद लवकर होण्यासाठी तातडीने बैठक घेऊन कार्यवाही सुरू करा,” असा आदेश आमदार आशुतोष काळे यांनी महसूल, दुय्यम निबंधक, सहायक निबंधक व भूमिअभिलेख विभागाला दिला आहे.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत. इतर हक्काची नावे परस्पर कमी केली जातात. औद्योगिक वसाहतीमध्ये वर्षानुवर्षे मोकळे असलेले भूखंड जप्त होत नाहीत,
पिकांची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर घेतली जात नाही; पडीक जमिनीवर पिके दाखवून अधिकारी भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करण्यात आला. मुद्रांक काळाबाजार,
नवीन सेवा संस्था स्थापन करण्यासाठी निबंधक कार्यालयाकडून “ना हरकत’ दाखला न मिळणे, सेतू कार्यालयात उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मनमानी पैसे घेणे,
असे प्रश्न उपस्थित करून, अतिक्रमण झालेल्या शिवरस्त्यांची व गावठाण जमिनीची मोजणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान उपस्थितांच्या सर्व समस्यां ऐकून आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित प्रशासनाला प्रलंबित कामे तात्काळ करण्याचे आदेश दिले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved