नैऋत्य मान्सून यंदा ‘या’ दिवशी घेणार निरोप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- यंदा देशात दीर्घकाळ रेंगाळलेला नैऋत्य मान्सून अखेर २८ ऑक्टोबरला निरोप घेण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी वर्तवली.

ईशान्य मान्सून दक्षिणेत दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. राज्यातून साधारणपणे सप्टेंबरअखेरीस परतीला सुरुवात करणाऱ्या मान्सूनचा राज्यातील मुक्काम यंदा तब्बल महिनाभर लांबला आहे.

आयएमडीने यंदापासून मान्सूनच्या आगमन आणि प्रस्थानाचे नवे कॅलेंडर जाहीर केले आहे. मात्र नव्या तारखांनाही मान्सूनने चकवा दिल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

नव्या कॅलेंडरनुसार वायव्य भारतातून १७ सप्टेंबरला मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तेथून यंदा २८ सप्टेंबरला मान्सून परतण्यास सुरुवात झाली.

सहा ऑक्टोबरपर्यंत त्याने दक्षिण गुजरातपर्यंत मजल मारली. दक्षिण गुजरातमध्ये मान्सूनच्या परतीला ब्रेक लागला. तब्बल १८ दिवस येथे थबकलेला नैऋत्य मान्सून आता २८ ऑक्टोबरपर्यंत देशातून निरोप घेण्याची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24