विद्यार्थिनीस शाळेतूनच पळविले; या ठिकाणी घडली घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-राहाता तालुक्यातील लोणी प्रवरानगर परिसरातील एका शाळेतुन सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास 17 वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला अज्ञात आरोपीने काहीतरी फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवुन नेले.

दरम्यान याप्रकरणी शाळेतील शिक्षिकेने लोणी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सफो फटांगरे हे करीत आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये अपहरणाच्या अनेक घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत. याआधी देखील दिवसाढवळ्या नगर शहरातील माळीवाडा परिसारातुन लहान मुलांना उचलून नेल्याची घटना घडली आहे.

अपहरणाच्या वाढत्या घटनांमुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना रोख बसावा तसेच या प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा अशी मागणी आता सर्वसामन्यांमधून होऊ लागली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24