अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- गुन्ह्यांच्या वेगवान तपास करून गुन्हेगारांना मुद्देमालासह अटक करून गावठी कट्टे व इतर साहित्य जप्त केलेल्या कारवाया बद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील कटके
व सहाय्यक निरीक्षक शिरिषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे व इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांचा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी सत्कार केला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल खटके व त्यांच्या पथकाने अल्पावधीत मोठ्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण केला याची दखल घेत पोलीस अधीक्षक पाटील यांनी एलसीबीच्या पथकाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. यावेळी पोलिस निरीक्षक अनिल कटके, शिरिषकुमार देशमुख, उपनिरीक्षक गणेश इंगळे, शंकर चौधरी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप घोडके, सचिन आडबल, प्रकाश वाघ, मलेश पाथरूड, दीपक शिंदे, रवी सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.
स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई सराफाला लुटणारे टोळी मुद्देमालासह जेरबंद केली, कुख्यात गुंड बंटी राऊतला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. जामखेड तालुक्यातील जवळा येथील गावठी काट्यातून गोळीबार करणाऱ्या आरोपीला २४ तासांच्या आत जेरबंद केले.
शेवगाव पाथर्डी तालुक्यातील रस्ता लूट करणारी टोळी मुद्देमालासह जेरबंद केली, जिल्ह्यातील वेगवेगळ्या चारचाकी व दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांची टोळी जालना येथून जेरबंद केली.
राजूरमध्ये मोबाईल शॉपी फोडून तीन लाखांचा ऐवज चोरून नेला होता, तो पथकाने नाशिक जिल्ह्यातून हस्तगत केला, या सर्व गुन्ह्यांचा अल्पावधीत तपास पूर्ण केल्याबद्दल पोलिस अधीक्षक पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कटके यांच्या पथकाचा सत्कार केला.