अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे, याला रोखण्यासाठी पोलिसांकडून देखील सकरात्मक पाऊले उचलली जात आहे.
मात्र अवैध धंदे सुरूच ठेवण्यासाठी काहीजण अनेक शक्कल लढवतात. मात्र याचा माग काढत पोलीस या अवैध धंदे चालकांच्या मुसक्या आवळत आहे.
नुकतेच भंडारदरा परिसरात पर्यटनाच्या नावाखाली अवैध दारूचा गोरखगधंदा चालू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्र परिसरात पर्यटनासाठी उभारण्यात आलेल्या ‘टेन्ट हाऊस’मध्ये हा प्रकार सर्रास चालू असून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला गस्त घालत असताना चक्क एक शिक्षकच अवैध दारूची वाहतूक करताना मिळून आला.
पोलिसांनी त्याच्याकडून एक बलेनो कारसह अंदाजे दहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. दरम्यान भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्र परिसरात पर्यटन विकासासाठी सरकारने सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा हा दृष्टीकोन ठेवून टेन्ट हाऊस ही संकल्पना सुरू केली आहे.
परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पर्यटन बंद झाल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांवर उपासमारीची वेळ आली. नुकतेच एका शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासत पर्यटन व्यवसायाला गालबोट लावले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भंडारदरा पाणलोट क्षेत्र परिसरात गस्त घालत असताना भगवान भागा अस्वले (वय 29, रा.मुरखेत) ह्याला पकडण्यात आले असून
त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीची मारूती सुझुकी बलेनो कार व अंदाजे दहा हजार रुपयांची विदेशी दारू जप्त केली आहे. प्रवीण थोरात यांच्या फिर्यादीवरून राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.