अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथे हाँटेल काका या ठिकाणी दारु विक्री केली जात असल्याचे लक्षात येताच सदर धाब्याची तपासणी केली करून दारू ताब्यात घेतली.
सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हाँटेलच्या गल्ल्यावर लहान मुले बसवून दारु विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले असता.
तहसिलदार यांचा पारा चांगलाच चढला थोड्याशा पैशासाठी लहान मुलांच्या जीवाशी खेळता का? थोडीशीही लाज वाटत नाही का? हाँटेल मधील सी.सी टिव्ही फुटेज चेक केले असता दिवसभार हाँटेल चालू असल्याचे लक्षात आले.
लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्यास मी माफ करणार नाही. प्रांतधिकारी जगताप व तहसिलदार शेख यांनी हाँटेल मालकावर आगपाखड करुन लपुन ठेवलेली दारु बाहेर काढण्यास सांगितली.
तहसिलदार यांनी हाँटेलवर छापा टाकल्याने राहुरी पोलिसांचे अवैध धंद्यांना पाठबळ असल्याचे समोर या निमित्ताने समोर आले आले.
तहसिलदार शेख यांनी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मोबाईलद्वारे संपर्क साधुन 3 हजार 700 रुपये किंमतीचा दारु साठा जप्त करुन हाँटेलचे मालक सुनिल सुखदेव घुले यास आस्थपना उघडी ठेवली म्हणून दोन हजार रुपये दंड केला.
तर राहुरी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क यांनी गुन्हा दाखल करुन हाँटेल मालकास ताब्यात घेण्यात आले. राहुरीचे प्रांतधिकारी डाँ.दयानंद जगताप, व तहसिलदार एफ.आर.शेख हे विकऐंड लाँकडाऊनची पहाणी करीत असताना राहुरी फँक्टरी येथील किराणा दुकानावर कारवाई करुन राहुरीकडे जात असताना
जोगेश्वरी आखाडा येथील हाँटेल काका टेबलवर दोन ते तीन जण दारु पिताना दिसले. याची खातरजमा करण्यासाठी प्रांतधिकारी जगताप व तहसिलदार शेख महसुल कर्मचारी महेश देशमुख यांनी हाँटेल काकावर छापा टाकल तर सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता
गल्ल्यावर लहान मुले तर हाँटेल मालक दारु विक्री करताना अढळून आला. प्रांतधिकारी व तहसालदार यांचा पारा चांगलाच चढला थोडे पैसे कमविण्यासाठी लहान मुलांच्या जीवाशी खेळता का? असे म्हणून राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार वाघ यांना पाचारण केले.
राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक धवल गोलेकर उके नेहुल यांनी घटनास्थळी भेट देवून 3 हजार 700 रु.किमतीची दारु जप्त करुन हाँटेल मालकास ताब्यात घेण्यात आले 65 ई प्रमाणे कारवाई करण्यात आली.