अहमदनगर बातम्या

12 तासांमध्ये अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल 9 अंशाने वाढ होऊन थंडीत घट! पुढचे तीन दिवस कसे राहणार वातावरण?

Published by
Ajay Patil

Ahilyanagar News:- बंगालच्या उपसागरात जे काही फेंगल चक्रीवादळ निर्माण झालेले आहे त्याचा परिणाम हा महाराष्ट्रावर दिसून येत असून राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे. इतकेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे देखील दिसून येत आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी देखील बारा तासात शहराच्या तापमानात 9 अंशाने वाढ झाली असून थंडीच्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याचे दिसून आले.

सोमवारी तर संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन देखील झाले नाही व पुढील तीन दिवस शहर व जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

आठ दिवसात पाच ते सहा अंशांनी झाली होती तापमानात घट
नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसातच थंडी वाढू लागली होती व गेल्या आठ दिवसाचा जर विचार केला तर अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये तब्बल पाच ते सहा अंशांनी घट झाली होती व त्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला लागला होता.

19 नोव्हेंबरला अहिल्यानगर शहराचे किमान तापमान 11.6° होते व त्यादिवशी राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद अहिल्यानगर मध्ये झाली होती.त्यानंतर किमान तापमानात परत घसरण पाहायला मिळाली होती.

या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या माध्यमातून थंडीची लाट येईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात आलेली होती व त्यामुळे शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तापमानात आणखी घसरण झाल्याने दिवसभर थंड वाऱ्याबरोबर थंडीचा कडाका जाणवत होता.

फेंगल चक्रीवादळाचा हवेतील वातावरणावर परिणाम
फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा हवेतील वातावरणावर झाला असून रविवारी 12 तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस व सोमवारी किमान तापमान 21 तर कमाल 28 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले व तापमानात नऊ अंशाने वाढ झाल्याचे दिसून आले. शहरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते व कुठेही सूर्यदर्शन झाले नाही.

चक्रीवादळाचा परिणाम होऊन थंडी देखील आता कमी झाली आहे व दोन दिवसात सहा अंशांनी तापमान घसरले आहे. तसेच वातावरणात काहीसा उकाडा देखील वाढल्याचे चित्र आहे.

यासोबतच वातावरणात झालेल्या या बदलाचा परिणाम गहू हरभरा या पिकांवर देखिल होण्याची शक्यता आहे. कारण या पिकांना थंडी ही पोषक असते व अशा वातावरण बदलामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील पिकांची काळजी घ्यावी अशी आवाहन हवामान तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil