अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे. यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. जिल्ह्यातील राहता तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत माजवली आहे.
राहाता तालुक्यातील नांदूर्खी खुर्द व नांदूर्खी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ घाबरलेले आहेत. राहाता तालुका परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने अनेक कुत्रे व शेळ्या फस्त केल्या आहेत पिंजरा लावूनही बिबट्या पिंजर्यात अडकत नाही.
घाबरलेल्या शेतकर्यांची या संकटातून वनविभाग कधी सुटका करणार, असा सवाल शेतकरी करू लागले आहे. दरम्यान कोळगे वस्ती येथील विष्णू कोळगे या शेतकर्याची शेळी दीपावलीच्या रात्री फस्त केल्याने या वस्तीवरही भीती निर्माण झाली आहे.
तर नांदुर्खी खुर्द येथील अनेक वस्त्यांवर बिबट्याकडून गेल्या पंधरा दिवसांपासून कुत्र्याचा फडशा पाडून आपली भूक भागविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या घटनेची माहिती नांदुर्खीचे पोलीस पाटील सोमनाथ वाणी, सरपंच बापू वाणी, जालिंदर वाणी, विजय वाणी,
संजय वाणी, अप्पासाहेब वाणी या ग्रामस्थांनी वन विभागाशी संपर्क साधून सदर बिबट्याला पकडण्यासाठी गावात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
मात्र बिबट्याने पिंजर्याला हुलकावणी दिल्याने शेतकरीही घाबरून गेले आहेत. वनविभागाच्या अधिकार्यांनी त्वरित बंदोबस्त करून या भागातील शेतकरी ऊसतोड कामगार यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved