Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्यासाठी आलेल्या डॉक्टरांचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रमेश जगन्नाथ धावते (वय ५३) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की बेलापूर आरोग्य केंद्रात आपण नोकरीला असून,
१० जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रात येथे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी आपण गेलो होतो, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोरुडे व इतर कर्मचाऱ्यांसोबत मी केबिनमध्ये चर्चा करत बसलो, त्यानंतर मी माझा २० हजार रुपये किंमतीचा मोबाईल टेबलवर काढून ठेवला व नंतर आपल्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी गेलो.
तीन ऑपरेशन झाल्यानंतर पुढील कामासाठी माळगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे असल्याने तेथील डॉक्टरांना फोन करण्यासाठी आपण खिशात हात घातला हात घातला असता फोन खिशात नव्हता तेव्हा, आपण केबिन केबिनमध्ये फोन विसरलो लक्षात आले.
तेव्हा आपण केबिनमध्ये गेलो असता तेथे फोन नव्हता, त्यामुळे आपण डॉक्टर बोरुडे यांच्या मोबाईलवरून फोन करून पाहिला असता तो बंद लागला. त्यामुळे आपला मोबाईल कोणीतरी अज्ञात चरणी या ठिकाणाहून चोरून नेला असल्याचे डॉक्टरांनी फिर्यादीत म्हटले आहे.