अहमदनगर बातम्या

एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी घेऊन जाणाऱ्याला चोरटयांनी लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

मोटारसायकलच्या डिक्कीतून ६ लाख रुपये अज्ञात दोन चोरट्यांनी लांबविल्याची खळबळजनक घटना संगमनेर शहरातील संगमनेर कॉलेज अकोले बायपास रोडवर घडली आहे. धर्मराज बाजीराव कासारे यांच्या सोबत हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीवरून शहर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संगमनेर शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी,धर्मराज कासार हे महिंद्रा कोटक बँकेतून ६ लाख रुपये काढून ते आपल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवून मोटारसायकलवरून जात होते. त्यानंतर कासार हे संगमनेरमधून घुलेवाडीकडे जात होते.

त्याच दरम्यान कासार हे अकोले बायपासजवळ गाडी उभी करून त्याठिकाणी खरेदी करण्यासाठी थांबले असता त्याचवेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकलच्या डिक्कीतून सहा लाख रुपये घेऊन पळ काढला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात चोरटे दिसून आले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24