अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- एटीमएम मध्ये पैसे काढताना अनेकदा पैसे चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र एटीएमवर पिन नंबर लिहिला असल्याने एकास साठ हजारांचा भूर्दंड पडला आहे.
घरातील एटीएम कार्ड व पिन नंबर चोरून एका भामट्याने बँक खात्यातील 60 हजार रुपयांची रक्कम काढून घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालमणी संदीप विरू (रा. कल्याण रोड, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी कल्याण रोडवरील बालाजी मंदिराजवळ असलेल्या विणकर सोसायटीमध्ये राहतात. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे घर फोडून कपाटात ठेवलेले एटीएम कार्ड चोरले.
त्या एटीएम कार्डवर पिन लिहिलेला होता. चोरट्याने एटीएम कार्डचा वापर करून फिर्यादी यांच्या खात्यातून वेळोवेळी 60 हजार रुपये काढून घेतले.
फिर्यादी यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक पालवे करीत आहेत.