अहमदनगर Live24 टीम, 11 ऑगस्ट 2021 :-भिंगार कॅम्प पोलिसांनी भिंगार शहरात चोरी करणार्या एकाला अटक केली तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. साहील राजू काकडे (वय 19 रा. सदर बाजार, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भिंगारच्या इंदिरानगर परिसरात चोरी करणारे दोन इसम नगर-पाथर्डी रोडवरील उद्यानामध्ये येणार असल्याची गोपनीय माहिती सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळाली होती.
त्यांनी पोलीस कर्मचारी ए. एन. नगरे, राहुल द्वारके, भानुदास खेडकर, अविनाश कराळे, अरूण मोरे यांचे पथक स्थापन करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या.
पोलिसांच्या पथकाने पाथर्डी रोडवरील उद्यान परिसरात आरोपी काकडे याला अटक केली तर त्याचा साथीदार अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
काकडे याच्याकडून रोख रक्कम व चोरीचे साहित्य असा 21 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत.