अहमदनगर बातम्या

मंत्री तनपुरे म्हणाले… ‘त्या’ गावांनाही निधी उपलब्ध करून देणार

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 01 नोव्हेंबर 2021 :- आमदार झाल्यापासून तालुक्यातील बहुतेक गावांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला असून ज्या गावांना अजून निधी मिळाला नाही, त्यांनाही निधी उपलब्ध करून दिला जाईल.

बारागाव नांदूर गटातील बहुतेक गावांना निधी दिला आहे. असे प्रतिपादन प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील सडे गावातील लोकार्पण सोहळाप्रसंगी ना. तनपुरे बोलत होते.

यावेळी ना. तनपुरे यांच्या हस्ते ग्रामसचिवालय इमारत, अंगणवाडी इमारत, आरओ प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले. ना. तनपुरे म्हणाले,

राहुरी तालुक्यातील सडे गावातील युवकांनी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा पूर्वीचा इतिहास बदलून गावाच्या विकासासाठी सर्व युवक एकत्र आल्याने सडे गावाचा चेहरामोहरा बदलून टाकून गाव आता आत्मनिर्भर बनला आहे.

जातींचे दाखले घरपोहोच करण्याच्यादृष्टीने तेथील प्रशासनास सूचना दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,

कृषीमंत्री यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महावितरणच्या विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून एक हजार जणांचा प्रश्न सुटला असून उर्वरित भरतीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office