अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील जवळा गावामध्ये रात्री सुमारे १ ते दीड वाजल्याच्या सुमारास दयानंद सुभाष कथले यांचे सोन्याचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री १ ते दीड सुमारास सोन्याच्या दुकानच्या आसपास राहणारे कुटुंबीयांना दुकानाच्या शटर तोडण्याचे व कुलूप तोडण्याचे आवाज आले.
आवाज कश्यचा येतो याची खात्री केली असता चोर आहेत व ते कुलूप तोडत आहेत असा आवाज येऊ लागला. तत्काळ दुकान शेजारील कुटुंबीयांनी सदर सोन्याच्या दुकान मालकाला फोन केला व तुमच्या दुकानाचा शटर तोडल्याचा आवाज येतोय तुम्ही बाहेर या असे सांगितले.
त्यानंतर लगेच दुकान मालक यांनी आरडाओरडा केला. ते आवाज एकूण चोरट्यांनी चार चाकी गाडीच्या साह्याने धूम ठोकली व पसार झाले.
तात्काळ पोलिसांशी संपर्क केला असता तात्काळ पोलिसांची गाडी पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी हजर झाले व विचारपूस करत पाहणी केली. सुदैवाने यामध्ये कसलेही आर्थिक नुकसान झाले नाही. सतर्कता बाळगल्याने अनर्थ टळला