अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- शेतातून वीजवाहक तारा तसेच विजेची टॉवर गेलेली असतात. अनेकदा या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
नुकतेच पाथर्डी तालुक्यात अशाच वीजवाहक तारामुळे तब्बल 25 एकर ऊस जाळून खाल झाला आहे. दरम्यान अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात घडला आहे.
कर्जत – कुळधरण -श्रीगोंदा रस्त्यालगतच्या शेतातून मोठ्या प्रमाणावर उच्च दाबाची वीजवाहिनी गेलेली आहे. विजेच्या खांबावरील कप निघून गेल्याने वेळोवेळी तारांचा एकमेकांना स्पर्श होतो. यातून होणाऱ्या स्पाकिंगमुळे शेतातील पिकांना आग लागते. दुरुस्तीची मागणी करूनही महावितरणकडून दुर्लक्ष केले जात आहे.
दरम्यान कुळधरण येथे लागलेल्या आगीत निलेश जगताप यांच्या नारळ झाडांचे मोठे नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतातून उच्चदाबाची वीजवाहिनी हटवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
या प्रकाराकडे महावितरणचे अधिकारी जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केले जात आहे.