हॉटेलमध्ये घुसून चोरटयांनी रोख रक्कम केली लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :-रात्रीच्यावेळी दोन अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या हॉटेलच्या मुख्य गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सामानाची उचकापाचक करून ३ हजारांची रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज लंपास कला आहे.

याबाबत वॉचमन आडेप याने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कायनेटीक चौकातील हॉटेल स्वराज पॅलेस येथे अरूण विठ्ठल आडेप हे वॉचमन म्हणून काम पाहतात.

दि.२४ रोजीरात्री हॉटेल बंद करण्यात आल्यानंतर रात्रीच्या वेळी दोन अज्ञात चोरट्यांनी रस्त्याच्या बाजूकडून पार्कींगच्या गेटचे कूलूप तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर आत प्रवेश करून काऊंटरची उचकापाचक करून ३ हजार रूपये रोख व एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा ऐवज लंपास केला.याबाबत वॉचमन आडेप यांच्या फिर्यादीरून कोतवाली पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24