घरात प्रवेश करून चोरटयांनी माल केला लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- अज्ञात भामट्याने घरात प्रवेश करून २६ हजार रुपये व १७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल असा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान नगर-मनमाड राज्य महामार्गालगत असलेल्या राहुरी खुर्द येथे घडली. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धामधुमीत सुरू असताना राहुरी खुर्द येथे चोरीची ही घटना घडल्याने घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

या प्रकरणी योगेश राजेंद्र नारायणे यांनी फिर्याद दिली आहे. यात म्हटले आहे की, मी कुटुंबासह घरात झोपेत असताना अज्ञात भामट्याने घराचा दरवाजा लोटून आत प्रवेश केला.

दोन मोबाइल, २६ हजार रुपयांची रोख रक्कम हा ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चोरीची ही घटना सकाळी उघडकीस आल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अमित राठोड करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24