कोरोनाचा धोका टळलेला नाही; खबरदारी घ्या; शिवसेनेचे आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाविकांसाठी आता सर्व मंदिरे उघडली आहेत. मात्र अद्याप करोना गेलेला नाहीये, त्यामुळे भाविकांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत भगवंताचे दर्शन घ्यावे, असे आवाहन शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शहर शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारने सर्व मंदिरे उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करत पाडव्याच्या दिवशी नवीपेठेतील प्रभूरामाच्या मंदिरात महाआरती करून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी जय श्रीराम… जय श्रीराम….च्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.

यावेळी दिलीप सातपुते म्हणाले, कोरोनाच्या भयंकर महामारीत संपूर्ण जग होरपोळून निघाले होते. राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे उघडण्याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला आहे.

यावेळी शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, विक्रम राठोड, संभाजी कदम, संतोष गेनप्पा, संजय शेंडगे, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, मदन आढाव,

अशा निंबाळकर, अरुणा गोयल, हर्षवर्धन कोतकर, संग्राम कोतकर, अंबादास शिंदे, सचिन शिंदे, अरुण झेंडे, संतोष ढमाले, शशिकांत देशमुख, काका शेळके, अशोक दहीफळे, राजेंद्र पटारे, सागर बत्तीन आदि उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24