अहमदनगर बातम्या

‘या’ ठिकाणी ‘द बर्निंग ट्रक’चा थरार नागरिकांच्या सतर्कतेमुळे चालक – सहचालक बचावले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नगर दौंड महामार्गावर बेलवंडी फाटा शिवारात पहाटे राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेल्या ट्रकने पाठीमागील बाजूने वायरींगचे शॉटसर्किट झाल्याने अचानक पेट घेतला.

जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून बेलवंडी पोलिसांना तात्काळ खबर दिल्याने पोलिस घटनास्थळी आले. अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक विझविण्यात आला. नागरिकांनी आग विझविण्यास प्रयत्न केल्याने मोठी जिवीतहानी व नुकसान टळले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजस्थानवरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेला ट्रक (क्र.एम.पी.३३ एच २३०६) शनिवार दि.२० रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बेलवंडी फाटा शिवारात आल्यानंतर वायरींगचे शॉटसर्किट होऊन ट्रकने अचानक पेट घेतला.

यावेळी प्रसंगावधान राखत ट्रकचालक पवन गुजर, सहचालक रणजित पाल गाडीतून उतरल्याने सुखरूप बचावले. या घटनेची माहिती स्थानिक रहिवाश्यांनी पोलिसांना दिल्याने बेलवंडी पोलिसांनी अग्निशमन दल पाचारण केले व स्थानिकांच्या मदतीने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवले.

यामुळे शेजारीच असलेल्या वनविभागाचे जंगल बचावले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांनी सांगितले.

घटनास्थळाजवळच आदिवासी वस्ती असून येथील एका युवकाने ट्रक पेटली असल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याला दिली. वेळेत अग्निशमन आल्यामुळे मोठा अनर्थ टाळला असल्याची चर्चा परिसरात आहे.

Ahmednagarlive24 Office