अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त वाहनचालक यांच्यावर वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये अनेक वाहनावर कारवाई करत कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे.
याबाबत करंजीघाट येथील महामार्ग पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह पांढरीचा पूल, नेवासा,
शेवगाव या महामार्गावरील रस्त्यावर वाहतुकीचे नियम न पाळणार्या तेवीस हजार ४८७ वाहनांवर धडक कारवाई करत त्यांच्याकडून एक कोटी १९ लाख २९ हजार सहाशे रुपयांचा दंड वाहतूक पोलीस पथकाकडून वसूल करण्यात आला आहे.
हि दंडात्मक कारवाई पुणे महामार्ग विभागाचे पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपाधिक्षक प्रीतम यावलकर, नगर महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये करंजी विभागाचे एएसआय धिवर, गोल्हार, कराड, पोटे, कांबळे, आव्हाड यांच्यासह पथकातील सर्व हवालदार, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.