अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड रस्त्यावर डिग्रस शिवारात ट्रक चालक नैसर्गिक विधीसाठी थांबलेला असताना अज्ञात चौघा चोरट्यांनी तेथे येवून मध्यप्रदेशातील ट्रक चालक संतोषकुमार शिवप्रसाद प्रजापती, वय २५ याला चाकुने भोसकण्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील ३ हजाराची रोकड, चांदीची चैन व अंगठी लुटून नेली.
दरम्यान सहा वाजण्याच्या सुमारास हा लुटमारीचा प्रकार घडला. ट्रक चालक संतोषकुमार शिवकुमार प्रजापती या तरुणाने राहूरी पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञात चौघा चोरट्यांविरुद्ध रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डिवायएसपी मिटके, पोनी गाडे यांनी भेट दिली. फरार आरोपींचा पोसई बोकील हे शोध घेत आहेत.