अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- जामखेड येथील मार्केट यार्ड मधुन ५ लाख ७५ हजार रुपये किंमतीचा सोयाबीनने भरलेल्या मालाचा ट्रक संबंधित ड्रायव्हरने लंपास केला आहे. या बाबत आडत व्यापारी यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
या बाबत समजलेली अधिक माहिती अशी की कृषी उत्पन्न बाजार समिती मधील फिर्यादी कृष्णा ट्रेडर्सचे मालक राजेंद्र भाऊसाहेब डोके (रा. मातकुळी ता. आष्टी) यांनी ट्रक चालक शफीक मोहमंदरसुल सय्यद
(रा. पिंपळगाव ता. भुम, जि.उस्मानाबाद) यास ट्रकमध्ये आडत दुकानातील २४७ सोयाबीनच्या गोण्या असा ५ लाख ७५ हजार १६२ रुपये किंमतीचा माल दि ११ डिसेंबर रोजी ट्रक मध्ये भरुन दिला होता.
सदरचा माल सांगली जिल्ह्य़ातील जयसिंगपूर येथील घोडावत फुड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या ठिकाणी पोहच करण्यास सांगितले. मात्र सदरचा माल त्या ठिकाणी पोहच झाला नाही.
ट्रक ड्रायव्हर शफीक मोहमंदरसुल सय्यद याने या मालाची परस्पर दुसरीकडे कोठेतरी अपहार करून विल्हेवाट लावली आहे. अशी फिर्याद जामखेड येथील आडत व्यापारी राजेंद्र डोके यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिली आहे.
त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.