अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- कोरोनाच्या जीवघेण्या संकटाला मात देत अनेक जण मृत्यूच्या दारातून परतले आहे. मात्र जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये आत्महत्येसारखे अगदी टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढले आहे.
यातच जामखेड मध्ये एका मुलीने आत्महत्या केली आहे. जामखेड शहरातील संताजीनगर परिसरातील इयत्ता बारावी मध्ये शिकत असलेल्या कु . साक्षी बाबासाहेब भालसिंग ( वय १८ ) या विद्यार्थीनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे . यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .
दरम्यान अधिक माहिती अशी कि, बारावी मध्ये शिक्षण घेत असलेली साक्षी ही नगरमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. पण सध्या वसतीगृह बंद असल्याने ती घरीच आनलाईन अभ्यास करत होती.
मात्र सकाळच्या सुमारास तिने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. साक्षी ने आत्महत्या का केली हेची उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
तिला ताबडतोब दवाखान्यात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले . वैद्यकीय अधिकारी यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली. पुढील तपास पोलिस पोहेकॉ बापूसाहेब गव्हाणे हे करीत आहेत .