अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील हॉटेल पंचवटीमध्ये वेटरला मारहाण केल्याची तसेच त्याच्या खिशातील दीड हजार रुपये लांबविल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी दोन जणांविरोधात संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वेटर रवींद्र तुकाराम उगलमुगले याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून या फिर्यादीवरून योगेश बोऱ्हाडे व रामदास बैरागी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, योगेश बोऱ्हाडे व रामदास बैरागी दोघेही (रा. साईश्रद्धा चौक) हे पंचवटी हॉटेलमध्ये जेवण करण्यास आले होते. या दोघांचे जेवण झाल्यानंतर वेटरने त्यांना बिल देऊन बिलाची मागणी केली.
बिलाची मागणी करताच त्याला दोघांनी मारहाण केली व त्याच्या खिशातील दीड हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी वेटरने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक खाडे हे करीत आहे.