अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- श्रीरामपुर तालुक्यात मुंबईहून आलेला दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने काल (दि. २३) त्यांना नगर येथे तपासणीसाठी हलविण्यात आले आहे.
त्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मोहन शिंदे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन झाल्यानंतर विदेश, बाहेरील राज्य व जिल्ह्यातून श्रीरामपुरात आलेल्या सुमारे साडेसात हजारजणांना आतापर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे.
यातील अनेकांचा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात शाळांमध्ये ८४१ व शहरात आलेले १०० जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.
त्यापैकी वडाळा महादेव येथील वैद्यकीय महाविद्यालयात १८ व समाज कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात ८२ जणांना ठेवण्यात आलेले आहे.
वडाळामहादेव येथील दोघांना सर्दी, खोकल्यासारखे कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले.
हे दोघेही चार ते पाच दिवसांपूर्वी मुंबई येथून आलेले होते. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील पावले उचलली जातील, अशी माहिती डॉ. शिंदे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com