अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :- गाडीचा कट मारल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना सोनई बसस्थानक परिसरात घडली आहे.
दरम्यान या मारामारीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
सोनई बसस्थानक परिसरात चारचाकी दुधाचा टेम्पो व प्रवाशी वाहतुकीची रिक्षा यात जाण्यायेण्याच्या मार्गावरून दोन वाहनचालकांत वाद झाले.
याबाबतची माहिती पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना सक्त ताकीद देत वाद मिटवले व दोन्ही गटांतील व्यक्तीना तेथून काढून दिले. त्यानंतर एक तासाने महाराष्ट्र बँकेसमोरील हॉटेलमध्ये त्याच दोन गटांत वाद होऊन झालेल्या मारहाणीत एक व्यक्ती जखमी झाला.
जखमीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असून जखमीची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी जखमीचा जबाब झाला नसल्याने गुन्हा दाखल नाही मात्र नातेवाईकास सांगितले असून रात्री गुन्हा दाखल होईल असे पोलिसांनी सांगितले.