अहमदनगर Live24 टीम, 8 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात चोरी, लूटमार आदी घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा बसावं यासाठी पोलीस पथके देखील सक्रिय झाली आहेत.
यातच रस्त्यात अडवून लुटणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्त्याने पायी जाणार्या पादचार्यांना लुटणार्या दोघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले आहे.
लूटमार प्रकरणी पंकज राजू माचरेकर आणि शाबीर दिलावर शेख या दोघाना पोलिसांनी गजाआड केले आहे. दसरम्यान या. आरोपींनी दि.2 नोव्हेंबर 2020 रोजी श्रीरामपूरातील रेल्वे भुयारी पुलाखालून पायी जाणार्या शेजल सुनिल चित्ते यांना अडवून त्यांच्या हातातील मोबाईल चारुन नेला होता.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने केला. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे,
सहायक फौजदार सोन्याबापू नानेकर, पोलिस कर्मचारी भाउसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवी सोनटक्के, प्रकाश वाघ, राहुल सोळुंके, रवींद्र घुंगासे, बबन बेरड यांच्या पथकाने श्रीरामपूरातून आरोपींना ताब्यात घेतलं आहे.