file photo

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे दहशत करणा-या दोघांना कर्जत पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर सोमवारी (दि.6) हजर केले असता, दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील पाटेगावात दहशत करणारे अक्षय प्रभाकर डाडर, समाधान सर्जेराव डाडर (दोघे रा. पाटेगाव ता.कर्जत) याचेतील आरोपी अक्षय याचे पाटेगाव गावात चिकनचे दुकान आहे, फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे यांनी पाटेगाव गावात चिकनचे दुकान नव्याने सुरू केले.

तक्रारदार यांनी नवीन दुकान का टाकले असे म्हणून फिर्यादी चंद्रकांत प्रकाश साबळे व फिर्यादीचे चुलते संदिप साबळे यांना त्रास देणे सुरू करून कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. या घटनेची माहिती होताच पोलीस पथकाने आरोपींना ताब्यात घेतले.

दरम्यान आज रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपी अक्षय प्रभाकर डाडर, समाधान सर्जेराव डाडर या दोघांना 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.