अवकाळी पावसाने घरांचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले, कांदेही भिजले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- वादळ आणि अवकाळी पावसाने अस्तगाव भागातील अनेक घरांचे पत्रे उडाली, शेतात साठविलेला कांदा भिजला.

काही ठिकाणी झाडांच्या फाद्या पडल्या, विजेचे खांबही पडले, यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.या वादळी पावसामुळे वीज परिवठा खंडित झाला होता.

काल दुपारी 4 नंतर पावसाळी वातावरण दिसून आले त्यानंतर पावणेसहाच्या दरम्यान वादळी वार्‍यांसह पावसाचे जोरदार आगमन झाले. उत्तर दिशेकडून पाऊस पडत असल्याने कांदा चाळींमध्ये पाणी शिरले.

काही शेतकर्‍यांनी शेतातच कांदा झाकून ठेवला होता. वार्‍याने त्यावरील झाकलेले उडाल्याने कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले.

वादळीवार्‍यात प्रचंड जोर असल्यान परिससरातील अनेक घरांचे छत उडून गेले. त्यामुळे अनेकांचे संसार उघडे पडले आहेत. त्यात काहींचे धान्यही भिजले आहे.

गावठाणातील एकनाथ बाणेदार यांचे राहात्या घराचे पत्रे उडाले आहेत. चाळीस वाडीतील सुंदर सोनवणे यांच्या घराचे छत, परसराम आष्टेकर यांच्या घराचे पत्रे,

गणेश गोदावरी कालव्याच्या लगत पुर्व बाजुला असलेल्या गणेश जेजुरकर यांच्या घराचे छत, सुधिर त्रिभुवन यांचे घराचे छत, काशिनाथ संतराम त्रिभान यांच्या संपूर्ण घराचे पत्रे उडून गेले आहेत.

माणिक बाबुराव त्रिभुवन यांच्याही घराचे पत्रे उडाले आहेत. याशिवाय बाजार तळाजवळील मोठ्या लिंबाची फांदी तुटून ते चंद्रकांत वसंतराव गाडेकर यांच्या दुकानच्या शेडवर पडली आहे.

कालव्याच्या पूर्व भागातील मल्हारी जेजुरकर यांच्या वस्तीनजीक विज वितरण कंपनीचे चार पाच विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यावरील विजेच्या तारा निखळून पडल्या आहेत. त्यामुळे विजपुरवठा खंडीत झाला आहे.

अहमदनगर

Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24