अहमदनगर Live24 ,19 जून 2020 : लोणी ( प्रतिनिधी) या संकट काळात देशातील प्रत्येक नागरिक या जवानांच्या मागे उभा आहे. पण या जवानांच्या बलिदान आपण कायम स्मरणात ठेऊन जर जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करा हीच या जवानांना खरी श्रद्धांजली ठरले असे मनोगत प्रवरा आरोग्य विद्यापीठाचे प्रा कुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज केले.
भारत-चीन सीमेवर चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत डाॅ राजेंद्र विखे पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरु डाॅ. वाय.एम.जयराज, अधिष्ठाता डाॅ राजवीर भलवार आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आपण सुरक्षित रहावे यासाठी हे जवान हुतात्मा झाले आहेत.
आपण सर्वांनी या बलिदानाचा विसर न पडू देता देश सेवे करीता कायम कटिबद्ध असले पाहीजे. यावेळी निवृत्त एअर व्हाईस मार्शल व ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ राजवीर भलवार यांनी जवानांना श्रध्दांजली वाहतांना गलवान व्हॅली या प्रदेशात आपण दोन वर्ष सेवा केल्याचे सांगत या प्रदेशातील कठीण भौगोलिक परिस्थिती विषद करतं.
जवानांनी बलिदान देत दाखवलेलं अतुलनीय साहस याचा आपण कधिच विसर पडू देऊ नये देशातील प्रत्येक नागरिकांना तिन्हीही सैन्य दलाच्या मागे उभे राहीले पाहिजे असे मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या सर्व डाॅक्टर व कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर काळ्या फिती बांधून काम करत चीनच्या या कृत्याच्या निषेध व्यक्त केल
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews