अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामान्य जनतेचे मोठे हाल होताहेत. त्यामुळे लॉकडाऊनऐवजी उपचाराबद्दल त्रिसूत्री वापरणे गरजेचे आहे.
कोरोनाचा सर्वांनी मिळून सामना करावा. मास्क वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा साध्या साध्या गोष्टी सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे.
मात्र कोरोनावर लॉकडाऊन हे उत्तर नाही, असे मत संगमनेरचे आ. डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केलंय. ते संगमनेरला म्हणाले,संगमनेरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. पण येथे प्रशासन उत्कृष्ट काळजी घेत आहे.
तेथे कुठल्याही प्रकारची ढिलाई नाही. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हेदेखील डोळ्यात तेल घालून येथे लक्ष देत आहेत. कोरोनाचे रुग्ण हे सर्वत्र वाढत आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रुग्ण वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
परंतु लॉकडाउन काही त्याचे उत्तर नाही, आणि ते सर्वत्र मान्य झाले आहे. दरम्यान, नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करावे की नाही, यावरून विविध मतमतांतरे मांडले जाऊ लागले आहेत.
काही लोकप्रतिनिधी लॉकडॉऊन करण्याची मागणी करत आहेत. तर त्याला काही लोकप्रतिनिधींकडून विरोध होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना आ. डॉ. तांबे यांनीही लॉकडाऊनबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, कोरोनाचे रुग्ण हे सर्वत्र वाढत आहे.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातदेखील रुग्ण वाढत आहेत. कारण लॉकडाऊन जेव्हा आपण उठवले, तेव्हा त्या काळात जी काळजी घ्यायला हवी होती, नागरिकांकडून ती घेण्यात आली नाही.
मध्यंतरी लग्न समारंभ झाले, तेथे जी काळजी घ्यायला हवी होती, ती घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु लॉकडाऊन काही त्याचे उत्तर नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com