अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाऊनची मालिका आजही कायम असून यामुळे मोठी आर्थिक तूट निर्माण झाली आहे. देशासह गावपातळीवर याचे मोठे परिणाम जाणवू लागले आहे.
यामुळे अनेकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातच नगर जिल्ह्यातील कर्जत नगर पंचायतीने शहरातील लहान-मोठ्या व्यापाऱ्यांचे कोरोना काळात आकारलेले विविध कर माफ करावेत,
अशी मागणी शहर भाजपने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना निवेदन देऊन केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मार्च २०२० पासून सर्वत्र कोरोनाचे संकट आले.
त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कर्जत शहरातील व्यवसाय बंद आहेत. यामुळे व्यापारीबांधव आर्थिक संकटात सापडले आहेत. नगर पंचायतीने ज्या व्यापारीबांधवांकडे विविध प्रकारचे कर थकले आहेत,
अशांना नोटिसा बजावल्या आहेत. नगर पंचायतीने घेतलेला निर्णय व्यापारीबांधवांसाठी अन्यायकारक आहे. तरी गेल्या दोन वर्षांतील कर माफ करावा,
अशी मागणी निवेदनात करण्यात आली. दरम्यान यामागणीवर सकरात्मक निर्णय होणार कि नाही याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.