अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांचे आरोग्यहित पाहत परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला.
याचे विद्यार्थी व पालकांनी स्वागतच केले.सोबतच सर्व महाराष्ट्रभर असे पसरले की सर्वच विद्यार्थ्यांना सरसकटपणे पास केले जाणार आहे;परंतु वस्तूस्थिती अशी नसून विद्यापीठांनी ए बी फॉर्मुल्यावदारे पासिंग क्रायटेरिया ठरवला आहे
आणि तोच अत्यंत चुकीचा आहे असा दावा स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की *सध्या शिक्षण मंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांची अवस्था अर्ध्या हळकुंडात पिवळे झाल्यासारखी असून उरलेला हळकुंड कुलगुरुंनी घरी नेले आहे अशी आहे.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी एकाधिकारशाही राबवत निकालाबाबत अतिशय चुकीचे धोरण राबवले आहे.आज शेकडो निकाल असे लागले आहेत.
की ज्यात पहिल्या सत्रात सर्व विषयांमध्ये पास झालेले विद्यार्थी आता मात्र परीक्षा न देताच नापास झालेले आहेत शिवाय काही ठिकाणी अचानक मागील सत्रात नापास झालेले विद्यार्थी सुद्धा या सत्रात परीक्षा न देता पास झालेले आहेत.
अन्याय झालेले शेकडो विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क साधत आहेत.अत्यंत विरोधाभास या निकालामध्ये दिसत आहे.
विद्यापीठ निकालाच्या फॉर्म्युल्यात स्मायलिंग अस्मिताने विद्यापीठासाठी नवीन फार्मूला सुचवला आहे व त्याची प्रत निवेदनाद्वारे पुणे विद्यापीठास देण्यात आली आहे.
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यास ते फोन घेत नाहीत. राज्यात जमावबंदी कायदा लागू आहे व विद्यार्थी गेल्या चार महिन्यांपासून घरात बसून वैतागले आहेत शिवाय अनेकांना नोकऱ्यांची भ्रांत आहे.
कोरोनामुळे आर्थिक स्थिती संपूर्ण बिघडली आहे; त्यातच कुलगुरूंचे हे चुकीचे धोरण यामुळे विद्यार्थ्यांचा असंतोष बाहेर येऊन कायदा सुव्यवस्थेला बाधा येऊ शकते.
सरकारने लवकरात लवकर या एबी फॉर्म्युलात बदल करण्यासाठी पावले उचलावीत किंवा या हेकेखोर कुलगुरूंना आणि परीक्षा नियंत्रकांना घरी पाठवावे असे मत यशवंत तोडमल यांनी मांडले आहे.
हुशार विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय विद्यापीठाने न थांबवल्यास लवकरच ठिकाणी विद्यार्थी शारीरिक अंतर पाळत ठिक ठिकाणी विद्यार्थी आंदोलन सुरू करतील शिवाय कुलगुरूंना जिल्ह्यात यापुढे पाऊल ठेवू देणार नाही असा इशाराही यशवंत तोडमल यांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com