आमदार लंकेनी दत्तक घेतलेले ते गाव बनणार ‘स्मार्ट व्हिलेज’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा संकट हळूहळू कमी होऊ लागले आहे. आता नेतेमंडळी देखील रस्त्यांवर उतरून जिल्ह्यातील विकासकामांना गती देत आहे.

यामध्येच जिल्ह्यातील नगर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी एक अतिशय कौतुकास्पद काम हाती घेतले आहे.

आमदार लंके यांनी काही दिवसांपूर्वी अकोळनेर गाव दत्तक घेतले होते. लंके यांच्या संकल्पनेतून अकोळनेर गाव स्मार्ट व्हिलेज साकार होणार आहे.

अकोळनेर गावातील लोकांसाठी रस्ते, पाणी, शिक्षण, वीज, आरोग्य या प्रमुख सोयीसुविधांसह इतर सोयीसुविधा वर भर देण्यात येणार असल्याची माहिती आरती ढोरमले यांनी दिली आहे.

अकोलनेर गांव महाराष्ट्रतील सर्वप्रथम स्मार्ट व्हिलेज होणार असून त्याबरोबरच गावकऱ्यांची आर्थिक परिस्थिती देखील यामुळे सुधारणार आहे. यासाठीचा आराखडा तयार केला आहे.

या उद्दिष्टा अंतर्गत प्रथमच महाराष्ट्रामध्ये स्मार्ट व्हिलेजमध्ये 100% टक्के पाणी पुरवठा 100% टक्के, वीज पुरवठा, सौरऊर्जा प्रकल्प, 100% शौचालय,

CCTV coverage wifi, गावची वेबसाइट, डिजिटल शाळा अशा अनेक सुविधांचा समावेश असेल अशी माहिती ढोरमले यांनी दिली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24