अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलेला असूनही निवडणूक घेता येणार नाहीत. त्यामुळे या गामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.
परंतु या ठिकाणी आपली मर्जीतील प्रशासक नेमला जावा यासाठी गावपुढाऱ्यांनी कंबर कसली होती. परंतु आता याठिकाणी प्रशासकीय अधिकारी प्रशासक म्हणून नेमावा असा निकाल न्यायालयाने दिल्याने या पुढाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे.
त्यामुळे आता हे सर्व पुढारी लवकरात लवकर कोरोना जावो आणि निवडणुका होऊन पुन्हा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हाती येवो, यासाठी काही गावपुढार्यांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 766 ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे.
तर ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या रिक्त जागांवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना प्रदान केले आहेत.
त्यामुळे आता सरकारी प्रशासक गावकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीवर त्या-त्या तालुक्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी तसेच कृषी अधिकारी, प्रशासन अधिकारी,
पर्यवेक्षिका, शाखा अभियंता व काही ठिकाणी केंद्रप्रमुखाची देखील नियुक्ती होणार आहे. तर मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी सहायक
गटविकास अधिकार्यांवरही येण्याची शक्यता आहे. या संदर्भातील पुढील सुनावणी आज (सोमवार) होणार असल्याने गावपुढारी याकडे लक्ष ठेऊन आहेत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved