तर गावाला 25 लाखांचा निधी दिला जाईल; आमदार लंकेची घोषणा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा मतदार संघातील 110 ग्रामपंचायतीच्या निवडणुका 15 जानेवारीला होत आहे. या अनुषंगाने आमदार निलेश लंके यांनी मोठी घोषणा केली आहे.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायती बिनविरोध निवडणूक करून शासनाच्या खर्चासह गावात एकात्मता आणि प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या ग्रामपंचायतींना आमदार निधीतून पंचवीस लाखांचा निधी देण्याची घोषणा आमदार निलेश लंके यांनी केली आहे.

राज्यातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. परंतु, आता सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर काढण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान या निवडणुकांच्या अनुषंगाने आमदार निलेश लंके म्हणाले कि, तालुका पातळीवरील राजकारण करणारे पुढारीना फक्त गावपातळीवर गटबाजी हवी अथवा हाणामाऱ्या हवेत ग्रामपंचायत निवडणूकीकडे सहसा लक्ष देत नाहीत.

दोन गट एकमेकांत झुंजले तरी आपल्या निवडणूकीला ते आपल्या बाजून कसे उभे राहतील यासाठी ते दोघांनाही गोंजारण्याचे काम करतात. आ. लंके यांनी मात्र गावागावातील पुढाऱ्यांना थेट आवाहन करून ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध करा, तुम्हाला गावच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी देतो अशी साद घातली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24