दिंडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी असे काही केले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-अद्याप ही कोरोनाचे संकट टाळलेले नाही त्यामुळे सरकारने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घातली आहे. मात्र यामुळे अनेक परंपरा खंडित होत आहेत.

त्या टाळण्यासाठी नागरिक विविध प्रकारचे उपाय शोधून काढत असुन सरकारच्या नियमांचे पालन करत परंपरा कायम ठेवत आहेत. श्रीक्षेत्र भाळवणी ते श्रीक्षेत्र आळंदी या दिंडीचे दरवर्षी आळंदी येथे जाण्यासाठी प्रस्थान होत असते.

परंतु यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंदी घालण्यात आली असल्याने दिंडीची परंपरा खंडित होऊ नये म्हणून कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने श्री. नागेश्वर पालखीची मिरवणूक काढण्यात येऊन ग्रामप्रदक्षिणा पुर्ण करण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24