ग्रामस्थांनी बंद पाडले महामार्गाचे काम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वतयार रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. ठिकठकाणी खड्डे पडलेले आहे. यामुळे दरदिवशी अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.

यातच आश्वासने देऊन काम न करणे अशा समस्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यातच कोपरगाव मध्ये ग्रामस्थांनी एका महामार्गाचे काम बंद पाडले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील समृद्धी महामार्गचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले असून आधी चांदेकसारे शिवारातील रस्त्यांचे काम करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

समृद्धी महामार्गचे काम करणाऱ्या गायत्री कंपनीचे चांदेकसारे गावामध्ये ऑफिस असून एक सिमेंट मिक्सर प्लांट आहे. या कामासाठी मागील अडीच वर्षापासून अवजड वाहने ये-जा करतात.

या वाहनाच्या वापरामुळे भैरवनाथ मंदिर रस्ता व गावातील इतर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धूळ आणि अवजड वाहनांमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गायत्री कंपनीने चांदेकसारे ग्रामपंचायतीला सर्व रस्ते करण्याचे आश्वासन दिले होते, तसेच गावातील अनेक विकास कामे करण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले होते,

परंतु त्याला ही कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. यामुळे चांदेकसारे ग्रामस्थांनी काल रात्री पासून काम पूर्णपणे बंद पाडले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24