अहमदनगर बातम्या

‘या’ ठिकाणी वेटरची गळा चिरून केली हत्या..! ‘ती’अज्ञात व्यक्ती कोण? पोलिस त्याच्या मागावर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- पारनेर तालुक्यातील पाडळी आळे येथे निघोज येथील एका हॉटेलवर काम करणाऱ्या वेटरची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे .

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील पाडळी आळे शिवारात बेल्हे रस्त्यालगत एका २४ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक घनशाम बळप

यांनी अधिक माहिती घेतली असता हा मयत तरुण निघोज येथील मंथन हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत असून त्याचे नाव मन्सूर अन्सारी (वय २४ रा. बिहार) असल्याचे आढळून आले .

याबाबत पारनेर पोलिसांनी निघोज येथील हॉटेल मंथनचे मालक राहुल लाळगे याना संपर्क केला असता मयत मन्सूर अन्सारी हा आपल्याच हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामला होता परंतु दोन दिवसांपासून तो हॉटेल वर कामासाठी येत नसल्याचे सांगितले. तसेच घटना घडली त्या दिवशी तो निघोज गावात दारू पिऊन हिंडत असल्याचे सांगितले.

तसेच त्याच्याबरोबर एक अनोळखी व्यक्ती असल्याचे सांगितले घटना घडायच्या आधी काही तासांपूर्वी त्याने हॉटेलचे मालक राहुल लाळगे यांना फोन करून मी पारनेर कारखान्याजवळ असून

मला हॉटेलवर नेण्यासाठी येण्याची विनंती केली होती परंतु त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ आला असल्याचे हॉटेल मालक लाळगे यांनी सांगितले.पोलिस त्या अज्ञात व्यक्तीचाशोध घेत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office