अहमदनगर शहराचा पाणी पुरवठा ‘ह्या’ कारणाने होणार विस्कळीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर शहराला होणार पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होणार असून शनिवारपासून पाणी पुरवठा पूर्ववत होणार आहे. त्यामुळे नगरकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात येत आहे.

त्याचे झालेय असे नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनला जुनी लाईन जोडण्याचे काम आज (गुरूवार) हाती घेण्यात आले आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

काय आहे कारण :- नगर शहराला मुळा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाच्या देहरे येथे नवीन व जुनी दोन्ही मुख्य जलवाहिनीला नव्याने टाकण्यात आलेली एम एस 1100 एम एम व डीआय 700 एम एम जोडण्यात येणार आहे.

कोणत्या भागावर कसा परिणाम –

– गुरुवारी (दि.8) बोलेगाव नागपूर सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड परिसर, लक्ष्मी नगर, सूर्य नगर, निर्मलनगर व तसेच स्टेशन रोड परिसर, सारसनगर, मुकुंद नगर, केडगाव, नगर कल्याण रोड वरील शिवाजीनगर परिसर सकाळी 10 नंतरच्या पाणी वाटपाच्या भागास पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

– शुक्रवारी (दि.9) रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या भागास म्हणजेच झेंडीगेट, डाळ मंडई, रामचंद्र खुंट, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हाडको व दुपारनंतर बुरुडगाव रोड परिसरात महानगरपालिके मार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागाला शुक्रवार ऐवजी शनिवारी (दि.10) पाणी पुरवठा केला जाणार आहे.

– शनिवारी (दि.10) पाणीपुरवठा होऊ घातलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागास सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थ नगर, लाल टाकी, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, कापड बाजार, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर, स्टेशन रोड, आगरकर मळा, सारस नगर परिसर भागात पाणीपुरवठा होणार नसून तो रविवारी (दि.11) करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24