खंडीत वीज पुरवठ्यामुळे नगरकरांच्या पाण्याचे वेळापत्रक कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- विज वितरण कंपनीच्या सोनेवाडी केडगाव येथील 132 के.व्ही.ए. ट्रान्समिशन लाईनमध्ये बिघाड निर्माण झाल्याने वीज पुरवठा खंडीत झालेला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानंतर दुरुस्तीचे काम हात घेण्यात आले मात्र या खंडित वीजपुरवठ्यामुळे नगर शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्व परिस्थिती विचारात घेऊन नागरिकांनी असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

दरम्यान वीज पुरवठा सुरु झाल्यानंतर मुळानगर, विळद पंपींग स्टेशन येथून बंद पडलेला पाणी उपसा टप्प्या टप्प्याने सुरु केल्यानंतर वसंत टेकडी येथे पुर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरु होण्यास किमान दोन ते तीन तासांचा अवधी जातो. यामुळे शहर पाणी वितरणाच्या पाण्याच्या टाक्या निर्धारीत वेळेत भरणे शक्य झालेले नाही.

Advertisement

परिणामी बुधवार दि.6 ऑक्टोबर रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास सिध्दार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, तोफखाना, चितळेरोड, आनंदीबाजार, माणिकचौक, कापडबाजार, नवीपेठ, जुने मनपा कार्यालय परिसर, सावेडी, बालिकाश्रमरोड इ. भागास पाणीपुरवठा होवू शकलेला नाही.

या भागास गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल. तसेच गुरुवार दि.7 ऑक्टोबर रोजी रोटेशननुसार पाणी वाटपाचे शहराच्या मध्यवर्ती भागास उदा.

झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, बंगालचौकी, सर्जेपूरा, कोठला, कचेरी परिसर, माळीवाडा, सावेडी इ. भागास पाणीपुरवठा होणार नाही. या भागास शुक्रवार दि.8 ऑक्टोबर रोजी पाणीपुरवठा करण्यात येईल.

Advertisement