अनेक गावांना जोडणारी जलवाहिनी रस्ता दुरुस्तीच्या कामामुळे विस्कळीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अनेकदा रस्त्यांची दुरुस्ती करताना पाण्याची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार नगरकरांना परिचित आहे. असाच प्रकार पुन्हा एकदा अकोले तालुक्यात घडला आहे.

मात्र जलवाहिनी फुटल्याने अनेक गावांना याचा फटका बसला आहे. गाव पाणी योजना पाईप लाईन रस्त्याच्या ठेकेदाराने उध्वस्त केल्याने माजी आमदार वैभव पिचड यांनी ठेकेदाराचे कान टोचत भविष्यात चुका होणार नाही, याची समज दिली.

कोल्हार घोटी राज्य मार्गाचे इंदोरी फाटा येथे काम सुरु असतांना शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचे (३२गाव पाणीपुरवठा योजनेचे पाईप) मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.

याबाबतची माहीती शेतकऱ्यांनी माजी आमदार पिचड व माजी मंञी मधुकरराव पिचड यांना दिली. माहिती मिळताच पिचड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ३२ गाव पाणी पुरवठा योजनेचे अधिकारी,

रोडचे मक्तेदार यांना समक्ष बोलवुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे व गाव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपचे दुरुस्ती करणे बाबतच्या सुचना दिल्या. तसेच येथुन पुढे नुकसान होऊ नये म्हणुन काळजी घ्यावी, असे सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24