अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील ५० पैकी ४५ ठिकाणी ग्रामस्थांनी लिलावाला विरोध केला. नुकत्याच झालेल्या लोक सुनावणीनंतर पाच ठिकाणच्या वाळूसाठ्याच्या लिलावांवर शिक्कामोर्तब झाले.
लिलावासाठी प्रस्तावित असणाऱ्या साठ्यामध्ये मुळा नदीपात्रातील राहुरी खुर्द येथील (१२७२ ब्रास) रॉयल्टीनुसार होणारी रक्कम ४७ लाख ४० हजार, पिंप्री चणकापूर (१ हजार ७४ ब्रास) ४० लाख २० हजार,
वळण (८ हजार ११० ब्रास) – तीन कोटी दोन लाख २५ हजार, तर प्रवरा नदीपात्रातील रामपूर येथील ३ हजार ५७८ ब्रास वाळू – एक कोटी ३३ लाख ३५ हजार, सात्रळ येथील पाच हजार तीनशे ब्रास वाळू – एक कोटी ९७ लाख ५३ हजार अशा १९ हजार ३०० ब्रास वाळू लिलावातून सुमारे ७ कोटी २० लाख शासकीय तिजोरीत जमा होणार आहेत.
हे लिलाव १ जानेवारी २०२१ नंतर केव्हाही जाहीर होतील. मागील वर्षी लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला होता. मात्र, राहुरी तालुक्यातील महसूल वसुली १०० टक्क्यांपेक्षा जास्त झाली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved