केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळातील घटकापर्यंत पोहचवणे आपल्या सर्वांची प्राथमिक जबाबदारी आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना यापूर्वी आठशे रुपये मिळत होते; परंतु महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आता पंधराशे रुपये मिळत आहे.
खरीप पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू असून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजनेच्या जाचक अटी शिथिल करून या योजनेत अर्ज भरण्यासाठी वाढीव दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.
आव्हाणे बु. ता. शेवगाव येथे आमदार मोनिकाताई राजीव राजळे व शेवगावचे तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, योजना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आमदार राजळे बोलत होत्या.
या वेळी भाजपा युवा मोर्चाचे तालुकध्यक्ष महेश फलके, वाघोलीचे सरपंच उमेश भालसिंग, उमेश धस आदी उपस्थित होते. या वेळी तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी या योजनेची व कागदपत्रांची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कचरू चोथे, सोमनाथ कळमकर, सचिन कोळगे, गणेश चोथे, शशिकांत खरात, अण्णासाहेब खैरे, माऊली दिवटे, बाबासाहेब खैरे, संदीप कोळगे, विनायक कोळगे, संदीप वाणी, नंदू आहेर, महेश आहेर, राजेंद्र कळमकर, मंथळ पांढरे, आदींनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक कचरू चौथे यांनी केले. सूत्रसंचालन सोमनाथ कळमकर यांनी केले. आभार सचिन कोळगे यांनी मानले. मेळाव्यास आव्हाणे परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या.